रातभरी मी तळमळते
किलबिल आली कानी खगांची
अजून न वाजे पाऊल ते
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | |
स्वर | - | जे. एल्. रानडे |
राग | - | जयजयवंती |
गीत प्रकार | - | भावगीत |
खग | - | पक्षी. |
भावगीत हा प्रकार ख्याल-संगीतापासून वेगळा पडला तो त्याच्या शब्दप्रधानतेमुळे किंवा भावप्रधानतेमुळे. रागदर्शन जिथे गौण ठरले आणि भावदर्शनाला महत्त्व आले त्या ठिकाणी भावगीतामधील शब्दांचे जाणीवपूर्वक लिखाण, त्याचप्रमाणे शब्दांचा जाणीवपूर्वक उच्चार होऊ लागला. काही गायकांनी शब्दांच्या आळवणीबरोबर सुरांचीही आळवणी गीत गात असताना केली. त्या गायकांनी गाण्यासाठी जी पदे निवडली तीच मुळात लहान, म्हणजे कमी शब्द असलेली. या गायकांनी आपल्या गायकीचेही दर्शन श्रोत्यांना घडवले.
काही गायक केवळ शब्द म्हणूनच थांबले, गाताना आलापी किंवा तानबाजी त्यांनी फारशी केली नाही. त्यांनी निवडलेल्या भावगीतांत शब्दांचे प्रमाण वाढले होते.
एकूण भावगीत परंपरेमध्ये या दोनही धारा बरोबरीने प्रवास करीत असलेल्या आपणास दिसतात. या दोन्ही प्रकारांना खतपाणी देणारे गायक जसे होते, तसे कवीही होते आणि संगीत-दिग्दर्शकही होते.
(संपादित)
यशवंत देव
शब्दप्रधान गायकी
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.