सांगूं कशी ग मनाची
सांगूं कशी ग मनाची व्यथा ही
पायदळीं कुस्करिल्या या फुलांची कथा ही
फुलली कलिका, प्रणया मनीं ये भरती
पडतां दंवबिंदू तुंटे देंठ, पाकळीवरती
उरे एकली ग जुईची लता ही
मातींत मिळोनीहि तुझा गंध दरवळे
झुलवाया तुज वारा ग वळवि पाउलें
तुझा जीविता रे पाळणा रिता ही
प्रीतिफुला बकुळा रे, नच पुरतां फुललासी
रंगविल्या आठवणी, आसवांत उरलासी
जळे जीवनीं या फुलांची चिता ही
पायदळीं कुस्करिल्या या फुलांची कथा ही
फुलली कलिका, प्रणया मनीं ये भरती
पडतां दंवबिंदू तुंटे देंठ, पाकळीवरती
उरे एकली ग जुईची लता ही
मातींत मिळोनीहि तुझा गंध दरवळे
झुलवाया तुज वारा ग वळवि पाउलें
तुझा जीविता रे पाळणा रिता ही
प्रीतिफुला बकुळा रे, नच पुरतां फुललासी
रंगविल्या आठवणी, आसवांत उरलासी
जळे जीवनीं या फुलांची चिता ही
गीत | - | राजा बढे |
संगीत | - | मधुकर गोळवलकर |
स्वर | - | माणिक वर्मा |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • काव्य रचना- ३० जानेवारी १९५१. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.