A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
साहवेना अनुराग

साहवेना अनुराग ! नको रे कान्हा
सोसत नाही निळाई

मन वेडे करू पाहे धिटाई
देहातून निळी वनराई
साहवेना अनुराग !

अधिर्‍या अधिर्‍या क्षणांचा अभिसार हा
अभिसारिकेस वाटे व्यभिचार का?
माने ना कान्हा, माने ना कान्हा
दंश निळ्याचा, उतारा निळ्यावर नाही रे नाही
साहवेना अनुराग !
गीत - वैभव जोशी
संगीत - हितेश मोडक
स्वर- केतकी माटेगावकर, सत्यम कुमार
चित्रपट - पांघरूण
गीत प्रकार - चित्रगीत
अनुराग - प्रेम, निष्ठा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  केतकी माटेगावकर, सत्यम कुमार