पाचूचा वनि रुजवा
युगविरही हृदयावर सरसरतो मधूशिरवा
भिजुनी उन्हे चमचमती
क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळ्या अवकाशी मधुगंधी तरल हवा
मनभावन हा श्रावण
प्रियसाजण हा श्रावण
भिजवी तन भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरांवर प्रणयी संकेत नवा
नभी उमटे इंद्रधनू
मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | श्रीधर फडके |
स्वर | - | आशा भोसले |
राग | - | चारुकेशी |
गीत प्रकार | - | ऋतू बरवा, भावगीत |
चाप | - | धनुष्य. |
बरवा | - | सुंदर / छान. |
शिरवे | - | पाऊस. |
पण हा शब्द आजच्या बोली भाषेतला नाही. संत साहित्यात वापरलेला आढळतो. जसे ज्ञानेश्वर माउली म्हणतात, 'तो हा विठ्ठल बरवा.. तो हा माधव बरवा' किंवा 'बरवा संत समागमु.. प्रकटला आत्मारामु'
मात्र शांताबाईंनी त्यांच्या या कवितेत हा प्राकृत शब्द अतिशय खुबीने आणि चपखल वापरला आहे. केवळ यमकासाठी केलेला तो अट्टहास वाटत नाही. जितकं सहज 'तो हा विठ्ठल बरवा'.. तितक्याच सहज 'ऋतु हिरवा, ऋतु बरवा'
* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.