A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रूप पाहतां लोचनीं

रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥

तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥

बहुतां सुकृतांची जोडी । ह्मणुनि विठ्ठलीं आवडी ॥३॥

सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवरू ॥४॥
गीत - संत ज्ञानेश्वर
संगीत - सी. रामचंद्र
स्वराविष्कार- आशा भोसले
पं. भीमसेन जोशी
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
चित्रपट - श्री संत निवृत्ति-ज्ञानदेव
गीत प्रकार - चित्रगीत, संतवाणी, विठ्ठल विठ्ठल
  
टीप -
• स्वर- आशा भोसले, संगीत- सी. रामचंद्र, चित्रपट- श्री संत निवृत्ती ज्ञानदेव.
• स्वर- पं. भीमसेन जोशी, संगीत- पारंपरिक.
आगर - वसतिस्थान.
बरवा - सुंदर / छान.
भावार्थ-

विठ्ठलाच्या दर्शनाने डोळ्याला किती सुख होत आहे ! पण त्यात नवल काहीच नाही. माधव आहेच तसा सुंदर ! सर्व सुखांचे आगरच आहे तो ! नवल हेच आहे की सर्वांना त्याच्या दर्शनाने असा आनंद होत नाही. पण यातही नवल नाही. कारण या आनंदाचे अधिष्ठान केवळ ती बाह्य मूर्ति नाही. हृदयातील प्रेम आहे. ईश्वराविषयी असे प्रेम अनेक जन्‍मांच्या पुण्याईनेच लाभत असते.

आचार्य विनोबा भावे
ज्ञानेश्वरांची भजनें
सौजन्य- परंधाम प्रकाशन, वर्धा.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  आशा भोसले
  पं. भीमसेन जोशी