वार्यावरती ध्वज हा फडके
जय हिन्द !
वार्यावरती ध्वज हा फडके, करीतसे ललकार !
स्वातंत्र्याचा करीत पुकार
हिन्दभूमीचा करीत पुकार
प्रिय जननीचा करीत पुकार
सर्व दिशांना ध्वज हा आमुचा, करितो जयजयकार !
सह्याद्रीच्या शिखरावरती
स्वातंत्र्याची ज्योत जागती
ही गगनीची वीज चमकती
मनात आमुच्या ही लखखती, ही लखलखती धार !
उंच हिमालय उत्तरेकडे
सागर गर्जे दक्षिणेकडे
धन-धान्याचे मळे चहुंकडे
मधून वाहे या भूमीतून प्रिय गंगेची धार, प्रिय कृष्णेची धार !
पुढे पुढे हा ध्वज फडफडे
पुढे पुढे पाऊल पडे
क्षितिज नवे हे पुढे उलगडे
नवीन किरणे नवीन गाणे, गाती नव्या युगाचे स्वार !
वार्यावरती ध्वज हा फडके, करीतसे ललकार !
स्वातंत्र्याचा करीत पुकार
हिन्दभूमीचा करीत पुकार
प्रिय जननीचा करीत पुकार
सर्व दिशांना ध्वज हा आमुचा, करितो जयजयकार !
सह्याद्रीच्या शिखरावरती
स्वातंत्र्याची ज्योत जागती
ही गगनीची वीज चमकती
मनात आमुच्या ही लखखती, ही लखलखती धार !
उंच हिमालय उत्तरेकडे
सागर गर्जे दक्षिणेकडे
धन-धान्याचे मळे चहुंकडे
मधून वाहे या भूमीतून प्रिय गंगेची धार, प्रिय कृष्णेची धार !
पुढे पुढे हा ध्वज फडफडे
पुढे पुढे पाऊल पडे
क्षितिज नवे हे पुढे उलगडे
नवीन किरणे नवीन गाणे, गाती नव्या युगाचे स्वार !
गीत | - | वि. म. कुलकर्णी |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वर | - | आकाशवाणी गायकवृंद |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
ललकार | - | चढा स्वर / गर्जना. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.