A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रिमझिम धून आभाळ भरून

पहिला पाऊस, पहिली आठवण
पहिलं घरटं, पहिलं अंगण
पहिली माती, पहिला गंध
पहिल्या मनात पहिलाच बंध
पहिलं आभाळ, पहिलं रान
पहिल्या झोळीत पहिलंच पान
पहिले तळहात, पहिलं प्रेम
पहिल्या सरीचा पहिलाच थेंब
पहिलाच पाऊस, पहिलीच आठवण
पहिल्या घरट्याचं पहिलंच अंगण

रिमझिम धून आभाळ भरून
हरवले मन, येणार हे कोण?

मन फुलांचा थवा, गंध हा हवा हवा
वाहतो वारा नवा, जुन्यात हरवून

गुज मनीचे मनाला, आठवुनी त्या क्षणाला
सांगावे का माझे मला, उगाच मनात बावरून

वार्‍यात गाणे कुणाचे, गाण्यात वारे मनाचे
मनाच्या वार्‍यात आतां, सुरांत तुला मी कवळून