रक्तकणांनी रेखांकित ही
रक्तकणांनी रेखांकित ही शपथ हुतात्मा वीरांची
यश-दीप्ती-सन्मान वाढवा, कीर्ती वाढवा देशाची
समान येथे सारे मानव, धर्म-जातीचा भेद नसो
समान संधी समान निर्णय, न्यायप्रीयता पूर्ण वसो
वैभव माना भिन्न वेष हे, विभिन्न भाषा प्रांतांची
नको आचरण भ्रष्ट कुणाचे, हिंसेचाही लेश नसो
विज्ञानाच्यासंगे आम्हा धर्माचाही लाभ असो
धारण करी जो सर्वांचे तो, प्रिय व्याख्या ही धर्माची

गीत | - | जयंत तारे |
संगीत | - | कनू घोष |
स्वर | - | आकाशवाणी गायकवृंद |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
दीप्ती | - | तेज. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.