A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पिंपळपान

आठवणींचा लेवून शेला
नटून बसली माय मराठी
दिवस झेलतो सुसाट वारा
तरीही दिव्यात जिवंत वाती

जगण्यामधल्या अर्थासंगे
बहकून गेले अक्षर-रान
वार्‍यावरती थिरकत आले
झाडावरुनी पिंपळपान

मातीमधे कुणी पेरला
दरवळणारा मंद सुगंध
व्यथा वेदना शब्दांमधली
गीतामधुनी वाहती छंद

माणूस म्हणुनी जिथे उगवते
हे असले काळे रान
वार्‍यावरती थिरकत आले
झाडावरुनी पिंपळपान
गीत - दासू
संगीत - अशोक पत्की
स्वर- सुरेश वाडकर
गीत प्रकार - मालिका गीत
  
टीप -
• शीर्षक गीत, मालिका- पिंपळपान, वाहिनी- झी मराठी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.