राधिके ऐक जरा बाई
राधिके ऐक जरा बाई
हरीचा संग बरा नाही
हरी हा थोरांचा ग बाळ
तुझ्यावर येईल नसता आळ
तुझी नच इतुकी पुण्याई
तयाच्या लागु नको नादी
चोर तो, तू अपुली साधी
अजूनही सावध तू होई
वयाचे ठेव जरा भान
दे जरा जगाकडे कान
आणि तू सासुरवाशिणही
पुरवितो आज तुझे कोड
उद्या तो दुसरीलाही गोड
छंद त्या नित्य नवा बाई
हरीचा संग बरा नाही
हरी हा थोरांचा ग बाळ
तुझ्यावर येईल नसता आळ
तुझी नच इतुकी पुण्याई
तयाच्या लागु नको नादी
चोर तो, तू अपुली साधी
अजूनही सावध तू होई
वयाचे ठेव जरा भान
दे जरा जगाकडे कान
आणि तू सासुरवाशिणही
पुरवितो आज तुझे कोड
उद्या तो दुसरीलाही गोड
छंद त्या नित्य नवा बाई
गीत | - | कवी सुधांशु |
संगीत | - | बबनराव नावडीकर |
स्वर | - | बबनराव नावडीकर |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |
कोड | - | कौतुक / आवड. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.