रचिल्या ऋषिमुनींनी ज्याच्या
रचिल्या ऋषिमुनींनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत
वरदायका गणेशा, महदाशया सुरेशा
का वेध लाविसी तू हेरंब एकदंत
येसी जळातुनी तू, कोणा कळे न हेतू
अजुनी भ्रमात सारे योगी-मुनी-महंत
मढ मंदिरात येती जे जे अनन्य भक्त
ते सर्व भाग्यवंत होतात पुण्यवंत
डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत
वरदायका गणेशा, महदाशया सुरेशा
का वेध लाविसी तू हेरंब एकदंत
येसी जळातुनी तू, कोणा कळे न हेतू
अजुनी भ्रमात सारे योगी-मुनी-महंत
मढ मंदिरात येती जे जे अनन्य भक्त
ते सर्व भाग्यवंत होतात पुण्यवंत
गीत | - | वसंत बापट |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | उषा मंगेशकर |
गीत प्रकार | - | प्रथम तुला वंदितो, भक्तीगीत |
अनन्य | - | एकरूप / एकटा. |
डंका | - | (डांका) कीर्ती, ख्याती / मोठा नगारा. |
दिगंतर | - | सर्वदूर. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.