पुस्तक नंतर वाचा
पुस्तक नंतर वाचा
आता खेळा, नाचा !
मी बाई फुलराणी
गाईन सुंदर गाणी
फुले भराभरा वेचा
आता खेळा नाचा
फूलपाखरू आले
मला हळूच म्हणाले,
"तू राजा रानाचा !"
आता खेळा नाचा !
कानी सुंदर डूल
तसे डुलते फूल
झुले झुला पानाचा
आता खेळा नाचा !
थेंब दंवाचे करती
चमचम गवतावरती
नजराणा किरणांचा
आता खेळ नाचा !
आता खेळा, नाचा !
मी बाई फुलराणी
गाईन सुंदर गाणी
फुले भराभरा वेचा
आता खेळा नाचा
फूलपाखरू आले
मला हळूच म्हणाले,
"तू राजा रानाचा !"
आता खेळा नाचा !
कानी सुंदर डूल
तसे डुलते फूल
झुले झुला पानाचा
आता खेळा नाचा !
थेंब दंवाचे करती
चमचम गवतावरती
नजराणा किरणांचा
आता खेळ नाचा !
गीत | - | मंगेश पाडगांवकर |
संगीत | - | मीना खडीकर |
स्वर | - | योगेश खडीकर, रचना खडीकर, शमा खळे |
गीत प्रकार | - | बालगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.