A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पुष्पपरागसुगंधित शीतल

पुष्पपरागसुगंधित शीतल अतिमंद चरे वनवायु हा ।
निखिलतरूंतिल पक्षि उठोनी शब्द करिति किति मंजु हा ॥

निबिडकुंजमुखिं मोर मयुरी नटुनि थटुनि नाचति हे ।
हरिण उडति बहु शशक धांवति गिरिवरि डोलत नाग हा ॥
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वराविष्कार- हिराबाई बडोदेकर
माणिक वर्मा
कीर्ती शिलेदार
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - सौभद्र
राग - अरब्बी
चाल-कोणि जाये ब्रिजमो दधिवेचन
गीत प्रकार - नाट्यसंगीत
कुंज - वेलींचा मांडव.
निखिल - सर्व.
निबिड - दाट.
शशक - ससा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  हिराबाई बडोदेकर
  माणिक वर्मा
  कीर्ती शिलेदार