देवाघरच्या फुला
देवाघरच्या फुला सोनुल्या, देवाघरच्या फुला !
अपुले मंगल सांगत नाते
बाळ घरी हे रांगत येते
आनंदाने हसत खेळतो झुलवित वारा झुला !
दुडु दुडु धावत हसे चिमुकला
असा जिवाचा माझा छकुला
अवतीभवती सुगंध सुंदर हाक घालितो तुला !
मायपित्याने तुला सोडिले
हृदयाने मम जवळ घेतले
भाग्यवान मी अमोल ठेवा असा लाभला मला !
अपुले मंगल सांगत नाते
बाळ घरी हे रांगत येते
आनंदाने हसत खेळतो झुलवित वारा झुला !
दुडु दुडु धावत हसे चिमुकला
असा जिवाचा माझा छकुला
अवतीभवती सुगंध सुंदर हाक घालितो तुला !
मायपित्याने तुला सोडिले
हृदयाने मम जवळ घेतले
भाग्यवान मी अमोल ठेवा असा लाभला मला !
गीत | - | गंगाधर महाम्बरे |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | अरुण दाते |
चित्रपट | - | सोबती |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.