प्रेमगीते आळविता भंगतो
प्रेमगीते आळविता भंगतो आलाप का?
प्रेमिकांच्या मीलनाला वेदनेचा शाप का?
सोबती येता हसुनी रात रंगे भोवती
आज एकाकीपणाला चांदण्याचा ताप का?
गंध नेला रंग नेला, राहिले निर्माल्य हे
वाहिले सर्वस्व पायी तरी भरेना माप का?
दो जिवांचे एक होणे का रुचेना ह्या जगी?
पुण्यवंतांनो तुम्हाला प्रेम वाटे पाप का?
प्रेमिकांच्या मीलनाला वेदनेचा शाप का?
सोबती येता हसुनी रात रंगे भोवती
आज एकाकीपणाला चांदण्याचा ताप का?
गंध नेला रंग नेला, राहिले निर्माल्य हे
वाहिले सर्वस्व पायी तरी भरेना माप का?
दो जिवांचे एक होणे का रुचेना ह्या जगी?
पुण्यवंतांनो तुम्हाला प्रेम वाटे पाप का?
गीत | - | यशवंत देव |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | सुधीर फडके |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.