प्रेम कोणीही करेना
प्रेम कोणीही करेना, का अशी फिर्याद खोटी?
प्रेम दे अन्यास आधी, ठेविशी का स्वार्थ पोटी?
आपुल्या या चारुतेशी विस्मरुनी जा सुकेशी
भाळता कोणास देशी का न भक्तीची सचोटी?
प्रेम का संगीन गुच्छी, प्रेम का रंगीन ओठी
प्रेम लाभे प्रेमळाला, त्याग त्याची ही कसोटी.

गीत | - | माधव ज्युलियन |
संगीत | - | जी. एन्. जोशी |
स्वर | - | जी. एन्. जोशी |
गीत प्रकार | - | भावगीत |
चारू | - | सुंदर. |
संगीन | - | व्यवस्थित / मजबूत, पक्का / बंदुकीच्या अग्रभागी लावण्याचे सुर्यासारखे शस्त्र. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.