प्रभु मी तुझ्या करातील
प्रभु मी तुझ्या करातील वीणा
आनंदाचे छेड सूर वा अश्रूजलाची करुणा
सात स्वरांच्या जोडुनी तारा
तूच घडविले या आकारा
तुझ्याच कोवळ करस्पर्शाने फुलवी तूच तराणा
तुझ्या मनातील दिव्य सुरावट
कुणी न जाणतो नशिबाचा पट
तव चरणांशी लीन होतसे रंक असो वा राणा
घे मजलाही तुझ्या पदासी
जन्म घालविन होऊन दासी
तुझ्याच भजनी समरसताना, मुक्ति मिळो या प्राणा
आनंदाचे छेड सूर वा अश्रूजलाची करुणा
सात स्वरांच्या जोडुनी तारा
तूच घडविले या आकारा
तुझ्याच कोवळ करस्पर्शाने फुलवी तूच तराणा
तुझ्या मनातील दिव्य सुरावट
कुणी न जाणतो नशिबाचा पट
तव चरणांशी लीन होतसे रंक असो वा राणा
घे मजलाही तुझ्या पदासी
जन्म घालविन होऊन दासी
तुझ्याच भजनी समरसताना, मुक्ति मिळो या प्राणा
गीत | - | शांताराम नांदगांवकर |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | माणिक वर्मा |
गीत प्रकार | - | भक्तीगीत |
पट | - | वस्त्र / सोंगट्या, बुद्धिबळे इ. ज्यावर मांडतात ते वस्त्र. |
रंक | - | भिकारी / गरीब. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.