अंजनीच्या सुता तुला रामाचं
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
हादरली ही धरणी, थरथरले आसमान
लक्ष्मणा आली मूर्च्छा लागुनिया बाण
द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण
तळहातावर आला घेउनी पंचप्राण
सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका
तिथे रामनामाचा तू वाजविला डंका
दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण
हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला
उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान
आले किती, गेले किती, संपले भरारा
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा
धावत ये लवकरी, आम्ही झालो रे हैराण
धन्य तुझे रामराज्य, धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा?
घे बोलावून आता कंठाशी आले प्राण
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
हादरली ही धरणी, थरथरले आसमान
लक्ष्मणा आली मूर्च्छा लागुनिया बाण
द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण
तळहातावर आला घेउनी पंचप्राण
सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका
तिथे रामनामाचा तू वाजविला डंका
दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण
हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला
उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान
आले किती, गेले किती, संपले भरारा
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा
धावत ये लवकरी, आम्ही झालो रे हैराण
धन्य तुझे रामराज्य, धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा?
घे बोलावून आता कंठाशी आले प्राण
गीत | - | दादा कोंडके |
संगीत | - | रामलक्ष्मण |
स्वर | - | महेंद्र कपूर |
चित्रपट | - | तुमचं आमचं जमलं |
गीत प्रकार | - | भक्तीगीत, चित्रगीत |
विभिषण | - | बिभिषण. रावणाचा भाऊ. सीतेस पळवून आणल्याबद्दल याने रावणास रागावले व तीस परत पाठवण्यास सांगितले. न होता हा रामाकडे गेला. रावणाच्या मृत्यूनंतर रामाने यास राज्य दिले. |
सुत | - | पुत्र. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.