A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रभातसमयो पातला

प्रभातसमयो पातला, आता जाग बा विठ्ठला !

दारी तव नामाचा चालला गजरू
देव-देवांगना गाती नारद-तुंबरू
दिंड्या-पताकांचा मेळा, तुझिया अंगणी थाटला !

दिठी दिठी लागली तुझिया श्रीमुखकमलावरी
श्रवणीमुखी रंगली श्रीधरा, नामाची माधुरी
प्राणांची आरती, काकडा नयनी चेतविला !