मन माझें चपळ
मन माझें चपळ न राहे निश्चळ ।
घडी एकी पळ स्थिर नाहीं ॥१॥
आतां तूं उदास नव्हें नारायणा ।
धांवें मज दीना गांजियेलें ॥२॥
धांव घालीं पुढें इंद्रियांचे ओढी ।
केलें तडातोडी चित्त माझें ॥३॥
तुका ह्मणे माझा न चले सायास ।
राहिलों मी आस धरुनी तुझी ॥४॥
घडी एकी पळ स्थिर नाहीं ॥१॥
आतां तूं उदास नव्हें नारायणा ।
धांवें मज दीना गांजियेलें ॥२॥
धांव घालीं पुढें इंद्रियांचे ओढी ।
केलें तडातोडी चित्त माझें ॥३॥
तुका ह्मणे माझा न चले सायास ।
राहिलों मी आस धरुनी तुझी ॥४॥
गीत | - | संत तुकाराम |
संगीत | - | सलील कुलकर्णी |
स्वर | - | सलील कुलकर्णी |
गीत प्रकार | - | मना तुझे मनोगत, संतवाणी |
तडातोडी | - | पृथक भाव, भेद / ताटातूट. |
सायास | - | विषेष आयास (कष्ट), श्रम. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.