घनश्याम पाहिला मी
घनश्याम पाहिला
मी घनश्याम पाहिला
दहीदुध लोणी हरी चोरिले
उखळाला मग तया बांधिले
धडपड करी ते हात चिमुकले
तो नंदलाल पाहिला
मोरपिसांचा मुकुट शोभतो
अधरी पावा मधुर वाजतो
गोपगोपिकांसवे नाचतो
मुरलीधर मी पाहिला
मेघासम तो श्याम सावळा
हृदयमंदिरी माझ्या लपला
स्वप्नी दिसला मधुर हासला
मनमोहन मी पाहिला
मी घनश्याम पाहिला
दहीदुध लोणी हरी चोरिले
उखळाला मग तया बांधिले
धडपड करी ते हात चिमुकले
तो नंदलाल पाहिला
मोरपिसांचा मुकुट शोभतो
अधरी पावा मधुर वाजतो
गोपगोपिकांसवे नाचतो
मुरलीधर मी पाहिला
मेघासम तो श्याम सावळा
हृदयमंदिरी माझ्या लपला
स्वप्नी दिसला मधुर हासला
मनमोहन मी पाहिला
गीत | - | योगेश्वर अभ्यंकर |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | सरस्वतीबाई राणे |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |
उखळ | - | कांडण्या−सडण्यासाठी दगड खोदून किंवा लाकडाचा ओंडका पोखरून केलेला खोलगट भाग. |
पावा | - | बासरी, वेणु. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.