प्रभातकाळी तुझे ईश्वरा
प्रभातकाळी तुझे ईश्वरा नाम मुखी येई
तूच माउली तूच साउली सावळे विठाई
नक्षत्रांचे दीप लोपले
विश्वकमळ हे पहा उमलले
चराचरावर अंधाराची होते ही अस्ताई
एकतारि मी हाती घेउन
तुझेच करिते मंगल चिंतन
वाहियले हे जीवन माझे प्रभु तुझ्या पायी
पुंडलिकाची पाहुनी भक्ती
उभा तूच या वीटेवरती
दासी जनी तुज शरण येतसे, जवळ तिला घेई
तूच माउली तूच साउली सावळे विठाई
नक्षत्रांचे दीप लोपले
विश्वकमळ हे पहा उमलले
चराचरावर अंधाराची होते ही अस्ताई
एकतारि मी हाती घेउन
तुझेच करिते मंगल चिंतन
वाहियले हे जीवन माझे प्रभु तुझ्या पायी
पुंडलिकाची पाहुनी भक्ती
उभा तूच या वीटेवरती
दासी जनी तुज शरण येतसे, जवळ तिला घेई
गीत | - | मधुकर जोशी |
संगीत | - | गोविंद पोवळे |
स्वर | - | माणिक वर्मा |
गीत प्रकार | - | विठ्ठल विठ्ठल, भक्तीगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.