तुज पाहिले असे अन् नशिबात
तुज पाहिले असे अन् नशिबात ये गुलामी
घायाळ काळजाला काही मुळी सुचेना
तुजवाचुनी जिवाला काहीच अन् रुचेना
या भाळल्या जिवाची पहिली अशी सलामी
नजरेत धुंद होत्या हुकुमी तुझ्या कट्यारी
घालून घाव गेल्या माझ्या असे जिव्हारी
आव्हान झेलले मी अन् जाहलो निकामी
डोळ्यांत घेउनी तू आलीस धुंद रात्री
लावून चांदण्याची गेलीस आग गात्री
स्वप्नांस रंग आले हे लाल अन् बदामी
घायाळ काळजाला काही मुळी सुचेना
तुजवाचुनी जिवाला काहीच अन् रुचेना
या भाळल्या जिवाची पहिली अशी सलामी
नजरेत धुंद होत्या हुकुमी तुझ्या कट्यारी
घालून घाव गेल्या माझ्या असे जिव्हारी
आव्हान झेलले मी अन् जाहलो निकामी
डोळ्यांत घेउनी तू आलीस धुंद रात्री
लावून चांदण्याची गेलीस आग गात्री
स्वप्नांस रंग आले हे लाल अन् बदामी
गीत | - | मंगेश पाडगांवकर |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | अरुण दाते |
गीत प्रकार | - | भावगीत |
गात्र | - | शरीराचा अवयव. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.