A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
​फुलल्या जीवनीं सुंदर

​फुलल्या जीवनीं सुंदर आशा ।
जणुं हा वसंत, येई उधळित ।
कलश सुखाचे दशदिशा ॥

भाग्यकाल हा जीवनीं आला ।
परम सुमंगल अमृतमय हा ।
वाटे हृदया क्षण ऐसा हा ।
चिरकाल उरावा ॥