ये पिकवूं अपुलं शेत
ये पिकवूं अपुलं शेत मंजुळे उगवूं मोतीचुरा
तुझ्या नि माझ्या रानप्रीतिचा झुळझुळ वाहे झरा
गुणगुणत करूं लावणी
घरधनीण अन् घरधनी
हळदीचे फिरती हात नांदती लक्षुमि माझे घरा
मंजुळे उगवूं मोतीचुरा
हे ओलवतीचं पाणी
करि बोलवती ही राणी
वर अंबर भरलं, सरसर झरलं, भिजली सारी धरा
मंजुळे उगवूं मोतीचुरा
बघ भरारला जोंधळा
हालते पात सळसळा
ते हिरवे लोलक डुलति मजेनं भरला ग हरभरा
मंजुळे उगवूं मोतीचुरा
मोत्यांची आंतरमाया
संभाळ कोवळी काया
येईल कळप राघुचा मारिते साळुंकी लहरा
आली ज्वानि तुझी बहरा
मंजुळे उगवूं मोतीचुरा
तुझ्या नि माझ्या रानप्रीतिचा झुळझुळ वाहे झरा
गुणगुणत करूं लावणी
घरधनीण अन् घरधनी
हळदीचे फिरती हात नांदती लक्षुमि माझे घरा
मंजुळे उगवूं मोतीचुरा
हे ओलवतीचं पाणी
करि बोलवती ही राणी
वर अंबर भरलं, सरसर झरलं, भिजली सारी धरा
मंजुळे उगवूं मोतीचुरा
बघ भरारला जोंधळा
हालते पात सळसळा
ते हिरवे लोलक डुलति मजेनं भरला ग हरभरा
मंजुळे उगवूं मोतीचुरा
मोत्यांची आंतरमाया
संभाळ कोवळी काया
येईल कळप राघुचा मारिते साळुंकी लहरा
आली ज्वानि तुझी बहरा
मंजुळे उगवूं मोतीचुरा
गीत | - | राजा बढे |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | मालती पांडे |
गीत प्रकार | - | भावगीत |
लहरा | - | तान. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.