A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पवित्र तो देह

पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ ॥१॥

तयाच्या चिंतनें तरतील दोषी । जळतील रासी पातकांच्या ॥२॥

देव इच्छी रज चरणींची माती । धांवत चालती मागें मागें ॥३॥

काय उरलें त्यां वेगळें आणिक । वैकुंठनायक जयां कंठीं ॥४॥

तुका ह्मणे देव-भक्तांचा संगम । तेथें ओघ नाम त्रिवेणीचा ॥५॥