घरोघरी वाढदिन
घरोघरी वाढदिन माझ्या वडिलांचा आला
बारा मास, सहा ऋतु अर्पिती वर्षमाला
देह चंदनाची काठी, झिजे ज्यांची लेकीसाठी
सेवा साफल्याची उटी, लावलीत पितृत्वाला
डोळियांच्या ओंजळीत तुडुंबली पाणगंगा
प्रेमाच्या तू पांडुरंगा, चला उठा आंघोळीला
सोडा आता उपवास, लेक झाली मिळवती
घ्या हो घास माझे हाती, वर्षाच्या या दिवाळीला
बारा मास, सहा ऋतु अर्पिती वर्षमाला
देह चंदनाची काठी, झिजे ज्यांची लेकीसाठी
सेवा साफल्याची उटी, लावलीत पितृत्वाला
डोळियांच्या ओंजळीत तुडुंबली पाणगंगा
प्रेमाच्या तू पांडुरंगा, चला उठा आंघोळीला
सोडा आता उपवास, लेक झाली मिळवती
घ्या हो घास माझे हाती, वर्षाच्या या दिवाळीला
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | लता मंगेशकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.