A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अगं पाटलाच्या पोरी जरा

अगं पाटलाच्या पोरी जरा जपून जपून
बिगिबिगी कुठं ग जाशी शेतामधून

तुझ्या गालाची खुलली लाली ग
जणू डाळिंब फुटलंया गाली
ल‌इ घुटमळतंय्‌ माझ्या मनात
चल जाऊ दूर मळ्यांत
संगं पिर्तीचं गाणं गाऊ दोघं मिळून

आलं ऊन ग भवती फुलुनी
कुठं जाशी तू ग फुलराणी?
काटं ग बोचतिल बाई
नाजुक तुझ्या पायी
तुझं चंद्रावाणी मुख जाईल सुकून !

रानी वार्‍यांची ऐकुन गाणी
नाचे झर्‍याचं झुळुझुळु पाणी
ल‌इ घुटमळतंय्‌ माझ्या मनात
चल जाऊ दूर मळ्यात
संगं पिर्तीचं गाणं गाऊ दोघं मिळून