का कळेना कोणत्या क्षणी
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे?
उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे?
बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे !
एक मी एक तू, शब्द मी गीत तू
आकाश तू आभास तू सार्यांत तू
ध्यास मी श्वास तू, स्पर्श मी मोहर तू
स्वप्नात तू सत्यात तू सार्यांत तू
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे?
उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे?
बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे !
घडले कसे कधी, कळते न जे कधी
हळुवार ते आले कसे ओठांवरी
दे ना तू साथ दे, हातात हात दे
नजरेतला नजरेतुनी इकरार घे

गीत | - | सतीश राजवाडे, श्रीरंग गोडबोले |
संगीत | - | अविनाश-विश्वजीत |
स्वर | - | बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर |
चित्रपट | - | मुंबई-पुणे-मुंबई |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.