तू निरागस चंद्रमा
तू निरागस चंद्रमा, तू सखी मधुशर्वरी
चांदणे माझ्या मनीचे पसरले क्षितिजावरी
काजळाचे बोट घे तू लावुनी गालावरी
मन्मनीचे भाव सारे उमलले चेहर्यावरी
पाहतो जेव्हा तुला मी गझल उमटे अंतरी
शब्द झाले सप्तरंगी झेप घेण्या अंबरी
सागराशी भेटण्या आतुर झाला हा रवि
भोवतीचे तेज सारे वाटते दुनिया नवी
हासता तू सूर ही झंकारले वार्यावरी
मी न माझी राहिले ही नशा जादुभरी
चांदणे माझ्या मनीचे पसरले क्षितिजावरी
काजळाचे बोट घे तू लावुनी गालावरी
मन्मनीचे भाव सारे उमलले चेहर्यावरी
पाहतो जेव्हा तुला मी गझल उमटे अंतरी
शब्द झाले सप्तरंगी झेप घेण्या अंबरी
सागराशी भेटण्या आतुर झाला हा रवि
भोवतीचे तेज सारे वाटते दुनिया नवी
हासता तू सूर ही झंकारले वार्यावरी
मी न माझी राहिले ही नशा जादुभरी
गीत | - | डॉ. इंगलहर्डीकर |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | स्वप्नील बांदोडकर, बेला सुलाखे |
चित्रपट | - | मानिनी (२००४) |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, चित्रगीत, युगुलगीत |
शर्वरी | - | रात्र. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.