पतितपावन नाम ऐकुनी
पतितपावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा
पतित पावन न होसी म्हणुनी जातो माघारा
घेशी जेव्हा देशी ऐसा असशी उदार
काय देवा रोधु तुमचे कृपणाचे द्वार
सोडी ब्रिद देवा आता न होसी अभिमानी
पतितपावन नाम तुजला ठेवियले कोणी?
हाती घेउनी धांगड झेंडा फिरेन त्रैलोकी
पतितपावन नव्हेसी हरी तू अति मोठा घातकी
नामा ह्मणे देवा तुझे नलगे मज काही
प्रेम असु द्या हृदयी तुमचे, आठवण पायी
पतित पावन न होसी म्हणुनी जातो माघारा
घेशी जेव्हा देशी ऐसा असशी उदार
काय देवा रोधु तुमचे कृपणाचे द्वार
सोडी ब्रिद देवा आता न होसी अभिमानी
पतितपावन नाम तुजला ठेवियले कोणी?
हाती घेउनी धांगड झेंडा फिरेन त्रैलोकी
पतितपावन नव्हेसी हरी तू अति मोठा घातकी
नामा ह्मणे देवा तुझे नलगे मज काही
प्रेम असु द्या हृदयी तुमचे, आठवण पायी
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | प्रसाद सावकार |
चित्रपट | - | संत गोरा कुंभार |
गीत प्रकार | - | संतवाणी, चित्रगीत |
कृपण | - | कंजूष. |
धांगड | - | जाडेभरडे; खरबरीत (कापड, सूत, इ.) |
पृथक्
ग. दि. माडगूळकर यांचे हे पद संत नामदेव यांच्या खालील रचनेवर आधारित आहे-
ग. दि. माडगूळकर यांचे हे पद संत नामदेव यांच्या खालील रचनेवर आधारित आहे-
पतितपावन नाम ऐकुनी आलों मी द्वारा ।
पतितपावन नव्हसी म्हणुनी जातों माघारा ॥१॥
घ्यावें तेव्हां द्यावें ऐसा अससी उदार ।
काय धरूनि देवा तुझें कृपणाचें द्वार ॥२॥
सोडीं ब्रीद देवा आतां नव्हेसि अभिमानी ।
पतितपावन नाम तुझें ठेविलें कोणीं ॥३॥
झेंगट घेउनी हाती दवंडी पीटीन तिहीं लोकीं ।
पतितपावन देवा परि तूं मोठा घातकी ॥४॥
नामा ह्मणे देवा तुझे नलगे मज कांही ।
प्रेम असोंदे चित्तीं म्हणूनि लागतसें पायीं ॥६॥
(गाथा- क्र. २२६३)
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.