A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पार्वती वेची बिल्वदळे

पार्वती वेची बिल्वदळे
शिवमूर्तीचे करिती चिंतन भावमुग्ध डोळे

धुके तरळते धूसर धूसर
भस्ममाखले दिसे चराचर
उष:कालचा प्रहर नव्हे हा, सांबरूप भोळे

फुले लहडली प्राजक्तावर
तो तर भासे प्रसन्‍न शंकर
सुमने कसली हास्य हराचे भूमीवर निथळे