तुझा खर्च लागला वाढू
तुझा खर्च लागला वाढू, सांग कितिदा कर्ज काढू?
नको अशी मला तू नाडू, सांग कितिदा कर्ज काढू?
शिवली असती, झाली का नसती, घरात वापरायाला
नवीनच चोळी, थोडी फाटली, लागलीस फेकायाला
नको बळंच आणखी फाडू, सांग कितिदा कर्ज काढू?
घरखर्चाला, दर दिवसाला, दहाचा आकडा लागे
मिर्ची-मसाला नाही आजला, तू मध्येच ओरडून सांगे
म्हणे आणा बुंदीचे लाडू, सांग कितिदा कर्ज काढू?
तुझा ग भाऊ, तो ऐतखाऊ, आला तुला भेटाया
महिना झाला राहून त्याला, तो तयार होई नाही जाया
त्यात पाहुणा टपकलाय साडू, सांग कितिदा कर्ज काढू?
अशी तू उधळी, जगावेगळी, बायको मला मिळाली
तुझ्याच पायी लाचारीची वेळ आज ही आली
आईबापाला आता काय धाडू, सांग कितिदा कर्ज काढू?

गीत | - | हरेंद्र जाधव |
संगीत | - | मधुकर पाठक |
स्वर | - | प्रह्लाद शिंदे |
गीत प्रकार | - | लोकगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.