A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पैंजण रुमझुमले

पैंजण रुमझुमले
पाऊल राधेचे पडले

रात्र वादळी दिशा लोपल्या
सर्व चराचर निशा झोपल्या
काळीज डुचमळले

उंबरठ्यावर चाहूल आली
सुगंध उधळित प्रीत लाजली
मानस परिमळले

लाजत मुरडत येई जवळी
साहस करुनी अशा अवेळी
प्रेम असे वळले
कवी बजरंग सरोदे यांची व माझी गाठभेट फार निराळ्या पद्धतीने झाली. पंजाबराव देशमुख यांचा पुतळा अकोट येथे बसवायचा होता. त्याच्या अनावरण सोहळ्यासाठी त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते. या प्रसंगासाठी एक प्रार्थनागीत कवी बजरंग सरोदे यांनी रचले होते. ते गीत मी व मोहनतारा अजिंक्य या दोघांनी गायले होते. ('शिव-शक्तीचा तुझ्यात झाला नवीन आविष्कार') या प्रार्थनागीताची नंतर एचएमव्हीने रेकॉर्ड प्रसिद्ध केली.

बजरंग सरोदे यांचे आणखी एक गीत माझ्यासाठी एचएमव्हीने रेकॉर्ड केले. ते म्हणजे 'पैजण रुमझुमले'. हे गीत म्हणजे शब्द व चाल यांच्या अप्रतिम मिश्रणाचे एक उदाहरण आहे.
(संपादित)

अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.