मी पतंग तू दोरा
मी पतंग तू दोरा
तू तुषार मी जलधारा
तुझे शिल्प हे घडविताना
असेल प्रभुची छान कल्पना
तुझ्या रूपाचा अनुपम नमुना वेड लावी भ्रमरा
मी पतंग तू दोरा
स्पर्श तुझा तो होता अवचित
सर्वांगाला करी रोमांचित
प्रेम आपुले करितो पुलकित लाजरा शहारा
तू पतंग मी दोरा
मौनातून हुंकार उमटला
स्वप्नातून आकार उमलला
मीलनात मज अर्थ उमजला प्रीत येई बहरा
तू पतंग मी दोरा
तू तुषार मी जलधारा
तुझे शिल्प हे घडविताना
असेल प्रभुची छान कल्पना
तुझ्या रूपाचा अनुपम नमुना वेड लावी भ्रमरा
मी पतंग तू दोरा
स्पर्श तुझा तो होता अवचित
सर्वांगाला करी रोमांचित
प्रेम आपुले करितो पुलकित लाजरा शहारा
तू पतंग मी दोरा
मौनातून हुंकार उमटला
स्वप्नातून आकार उमलला
मीलनात मज अर्थ उमजला प्रीत येई बहरा
तू पतंग मी दोरा
गीत | - | रघुबंधू |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | जयवंत कुलकर्णी, उषा किर्तने |
चित्रपट | - | यालाच म्हणतात प्रेम |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.