पहिल्याच सरीचा ओला
पहिल्याच सरीचा ओला सुवास आला
माहेरच्या दिसांचा क्षण काळ भास झाला
ओलीसुकी सुखाची, बोली मुकी मुखाची
घाटात वाट होती कोंदाटल्या धुक्याची
आला वळीव आता हा नेमका कशाला
हुंकारत्या दिशांना फुटले निळे धुमारे
बघ गारवा थरारे उबदार हे शहारे
रेंगाळत्या धुपाने गाभारले मनाला
मेघांमधुन आले हे ऊन कोवळेसे
ओसंडले सभोवती आकाश सावळेसे
वृंदावनात आला गोपाळकॄष्ण काळा
माहेरच्या दिसांचा क्षण काळ भास झाला
ओलीसुकी सुखाची, बोली मुकी मुखाची
घाटात वाट होती कोंदाटल्या धुक्याची
आला वळीव आता हा नेमका कशाला
हुंकारत्या दिशांना फुटले निळे धुमारे
बघ गारवा थरारे उबदार हे शहारे
रेंगाळत्या धुपाने गाभारले मनाला
मेघांमधुन आले हे ऊन कोवळेसे
ओसंडले सभोवती आकाश सावळेसे
वृंदावनात आला गोपाळकॄष्ण काळा
गीत | - | शिरीष गोपाळ देशपांडे |
संगीत | - | श्रीधर फडके |
स्वर | - | अनुराधा पौडवाल |
गीत प्रकार | - | भावगीत, ऋतू बरवा |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.