पहा पहा काय सुंदर
पहा पहा काय सुंदर । दिसे शोभा वीर नरवर ।
नंदिकेश्वर पृष्ठीवर । आरुढला त्रिपुरांत कर हर ॥
हेमघंटा नाद घणघण । दोहिं भागीं सर्वही गण ।
नंदी भृंगी धरिति वेसण । उडविती वर छत्रचामरें ॥
शंख दुंदुभि डमरु वाजत । भूतांचा सरदार गाजत ।
आली स्वारी किती साजत । आज त्या बघतों नयनभरें ॥
नभीं दाटलीं सुरविमानें । पहाया तुज संभ्रमानें ।
कुसुम वर्षति अती मानें । बलवंता हर्ष निर्भर ॥

गीत | - | अण्णासाहेब किर्लोस्कर |
संगीत | - | अण्णासाहेब किर्लोस्कर |
स्वर | - | पं. वसंतराव देशपांडे, भार्गवराम आचरेकर |
नाटक | - | रामराज्यवियोग |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
दुंदुभि | - | नगारा, एक वाद्य. |
हेम | - | सोने. |
हर | - | शंकर. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.