ओटी भरा ग ओटी भरा
जाणार आज मी माहेराला
ओटी भरा ग ओटी भरा,
माझी ओटी भरा
हिरवि चोळी शालु हिरवा
हाती भरला हिरवा चुडा
हिरवा मरवा वेणींत घाला,
माझ्या वेणींत घाला
हिरव्या वेली हिरव्या रानीं
मधें मी बसले हिरवी राणी
हिरवा चौरंग बसायला,
मला बसायला
माझी मला जड झाली पाऊले
डोळ्याभवती काळी वर्तुळें
आशीर्वाद तुम्हि द्या ग मला,
तुझी द्या ग मला
हंसू नका ग गुपित सांगते
आज जरी मी एकलि जाते
आणिन संगे युवराजाला,
माझ्या युवराजाला
ओटी भरा ग ओटी भरा,
माझी ओटी भरा
हिरवि चोळी शालु हिरवा
हाती भरला हिरवा चुडा
हिरवा मरवा वेणींत घाला,
माझ्या वेणींत घाला
हिरव्या वेली हिरव्या रानीं
मधें मी बसले हिरवी राणी
हिरवा चौरंग बसायला,
मला बसायला
माझी मला जड झाली पाऊले
डोळ्याभवती काळी वर्तुळें
आशीर्वाद तुम्हि द्या ग मला,
तुझी द्या ग मला
हंसू नका ग गुपित सांगते
आज जरी मी एकलि जाते
आणिन संगे युवराजाला,
माझ्या युवराजाला
गीत | - | मा. ग. पातकर |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | मोहनतारा अजिंक्य |
गीत प्रकार | - | भावगीत |
मरवा | - | सुगंधी पाने असलेली एक वनस्पती. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.