ओळख पहिली गाली हसते
ओळख पहिली गाली हसते
सांग दर्पणा कशी मी दिसते
आषाढीच्या तिन्हीसांजेला
पैलतिरी त्या पाणवठ्याला
बघुनी ज्याला जीव लाजला
आठवण त्याची हृदयी ठसते
नाव जयाचे घुमता कानी
चित्र रंगते मिटल्या नयनी
बाहुपाशी जाता विरुनी
माझ्यावर मी जेव्हा रुसते
करी बांगडी राजवार्खी
नथणी-बुगडी तुझ्यासारखी
तुझ्यापरी तो रत्नपारखी
म्हणुनी तुजला घडी घडी पुसते
सांग दर्पणा कशी मी दिसते
आषाढीच्या तिन्हीसांजेला
पैलतिरी त्या पाणवठ्याला
बघुनी ज्याला जीव लाजला
आठवण त्याची हृदयी ठसते
नाव जयाचे घुमता कानी
चित्र रंगते मिटल्या नयनी
बाहुपाशी जाता विरुनी
माझ्यावर मी जेव्हा रुसते
करी बांगडी राजवार्खी
नथणी-बुगडी तुझ्यासारखी
तुझ्यापरी तो रत्नपारखी
म्हणुनी तुजला घडी घडी पुसते
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | आशा भोसले |
गीत प्रकार | - | भावगीत |
बुगडी | - | स्त्रियांचे कर्णभूषण. |
राजवर्खी बांगडी | - | एक प्रकारची चकचकीत नक्षीदार बांगडी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.