A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
निशिदिनिं मनि धरिला

निशिदिनिं मनि धरिला हरिला ।
विसर न पडला या सुहृदांचा ।
व्यालकालगत भेद निमाला ॥

प्रेमपुनीता मधुमति गीता ।
हृदयकुसुमिता परभयभीता ।
स्वाराज्ये परिमल भरला ॥
गीत - भा. वि. वरेरकर
संगीत - वझेबुवा
स्वर- रामदास कामत
नाटक - तुरुंगाच्या दारात
राग - भैरवी
ताल-त्रिवट
चाल-नैनसी नैने मिला
गीत प्रकार - नाट्यसंगीत, मना तुझे मनोगत
निशिदिनी - अहोरात्र.
पुनीत - शुद्ध, पवित्र.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.