लहानपण दे गा देवा
लहानपण दे गा देवा ।
मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर ।
त्यासी अंकुशाचा मार ॥२॥
जया अंगीं मोठेपण ।
तया यातना कठीण ॥३॥
तुका ह्मणे बरवे जाण ।
व्हावे लहानाहून लहान ॥४॥
(महापूरे झाडे जाती ।
तेथे लव्हाळ वाचती ॥५॥)
मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर ।
त्यासी अंकुशाचा मार ॥२॥
जया अंगीं मोठेपण ।
तया यातना कठीण ॥३॥
तुका ह्मणे बरवे जाण ।
व्हावे लहानाहून लहान ॥४॥
(महापूरे झाडे जाती ।
तेथे लव्हाळ वाचती ॥५॥)
गीत | - | संत तुकाराम |
संगीत | - | पं. कुमार गंधर्व |
स्वर | - | पं. कुमार गंधर्व |
नाटक | - | लहानपण देगा देवा |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत, संतवाणी |
बरवा | - | सुंदर / छान. |
लव्हाळे | - | गवत. |
भावार्थ-
- ए देवा, तू मला लहानपणच दे कारण लहान मुंगीला साखरेचे कण खायला मिळतात.
- इंद्राचा ऐरावत हत्ती किती मोठा? पण हत्तींना रोज अंकुशाचा मार खावा लागतो.
- ज्याच्या अंगी मोठेपणा आहे त्याला फार त्रास सहन करावा लागतो. कष्ट सोसावे लागतात.
- याकरिता तुकाराम महाराज म्हणतात, आपण लहानापेक्षा लहान होणे चांगले, हे लक्षात घ्या.
गो. वि. नामजोशी
संत तुकारामाची सार्थ अभंगवाणी
सौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.