निंदिती हे लोक जरीही
निंदिती हे लोक जरीही विसर त्यांचे बोलणे
या जगाची रीत आहे, निंदणे मग वंदणे
लोकपालन करित होता तरीही रामा निंदिले
पतिव्रता सीता जरीही पापी तिजला ठरविले
वाचता रामायणी ते भरून येती लोचने
ज्ञानदेवाला जगाने मारिले पिडिले किती
परि समाधीवरी तयाच्या आसवे जन ढाळिती
जीवन आहे दो घडीचे, ऊन केव्हा चांदणे
पुत्र होता सारथ्याचा म्हणुन कर्णा निंदिले
कवचकुंडल दान देता लोक वंदू लागले
जे असे भाळी तुझ्या ते तोवरी तू सोसणे
या जगाची रीत आहे, निंदणे मग वंदणे
लोकपालन करित होता तरीही रामा निंदिले
पतिव्रता सीता जरीही पापी तिजला ठरविले
वाचता रामायणी ते भरून येती लोचने
ज्ञानदेवाला जगाने मारिले पिडिले किती
परि समाधीवरी तयाच्या आसवे जन ढाळिती
जीवन आहे दो घडीचे, ऊन केव्हा चांदणे
पुत्र होता सारथ्याचा म्हणुन कर्णा निंदिले
कवचकुंडल दान देता लोक वंदू लागले
जे असे भाळी तुझ्या ते तोवरी तू सोसणे
गीत | - | मधुकर जोशी |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.