नीज रे नीज रे बाळा
नीज रे नीज रे बाळा,
थांबिव हा तव चाळा
मांडिवरी घेते, पाळण्याशी नेते,
अंगाई गाते, वेल्हाळा
टपोरे सुंदर डोळे विसावले पापणीत
मंद झाली स्मितरेषा लालसर जीवणीत
दमूनभागून खोड्या संपवून झोपतो कृष्ण सावळा
कौसल्येच्या रामापरी, कीर्त वाढव दिगंतरी
तुझ्या यशाचे शिखर, माझी मनाची पायरी
काजळ घालते, तीट मी करते, दृष्ट नको लाडक्याला
थांबिव हा तव चाळा
मांडिवरी घेते, पाळण्याशी नेते,
अंगाई गाते, वेल्हाळा
टपोरे सुंदर डोळे विसावले पापणीत
मंद झाली स्मितरेषा लालसर जीवणीत
दमूनभागून खोड्या संपवून झोपतो कृष्ण सावळा
कौसल्येच्या रामापरी, कीर्त वाढव दिगंतरी
तुझ्या यशाचे शिखर, माझी मनाची पायरी
काजळ घालते, तीट मी करते, दृष्ट नको लाडक्याला
दिगंतर | - | सर्वदूर. |
वेल्हाळ | - | परम प्रीतिपात्र. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.