A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
लागली आज सतार स्वरांत

लागली आज सतार स्वरांत !

आज स्पर्शिता अलगद पडदा
उठे हवा तो दिड्‌दा दिड्‌दा
फुलुनी येती भाव कधी जे रुतले खोल उरात !

माझी असुनी माझी नव्हती
ती माझी हो, सूरसंगती
वाहत वाहत जीव मिसळला सौख्याच्याच पूरात !

साज लागला, साथ लाभली
नवगीतांच्या आता मैफली
बेसूर-कणसूर कधीच दडले काळाच्या उदरात !