नीज माझ्या नंदलाला
नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे
शांत हे आभाळ सारे
शांत तारे, शांत वारे
या झर्याचा सूर आता मंद झाला, मंद झाला रे
झोपल्या गोठ्यात गाई
साद वा पडसाद नाही
पाखरांचा गल्बलाही बंद झाला, बंद झाला रे
सावल्यांची तीट गाली
चांदण्याला नीज आली
रातराणीच्या फुलांचा गंध आला, गंध आला रे
नीज रे आनंदकंदा,
नीज रे माझ्या मुकुंदा
आवरी या घागर्यांच्या छंदताला, छंदताला रे
शांत हे आभाळ सारे
शांत तारे, शांत वारे
या झर्याचा सूर आता मंद झाला, मंद झाला रे
झोपल्या गोठ्यात गाई
साद वा पडसाद नाही
पाखरांचा गल्बलाही बंद झाला, बंद झाला रे
सावल्यांची तीट गाली
चांदण्याला नीज आली
रातराणीच्या फुलांचा गंध आला, गंध आला रे
नीज रे आनंदकंदा,
नीज रे माझ्या मुकुंदा
आवरी या घागर्यांच्या छंदताला, छंदताला रे
गीत | - | मंगेश पाडगांवकर |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | लता मंगेशकर |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |
आनंदकंद | - | आनंदाचा उगम. |
घागरी | - | पैंजण. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.