ने मज पैलतीरी
ने मज पैलतीरी
कोण कुणाची जलराणी ग सांग सखे सुंदरी
मी धीवरकुंवरी या यमुनेवरि, चालविते फेरी
ही सुकुमारी तरी कशि ग नेशिल पैलतीरी
राजया, चला या जलांत माझी नौका
भिउं नका मुळी अंतरी, बघा तरि माझी चलचातुरी
मनामनांचा सुरेख संगम, तरंगते अंतरी
ने मज पैलतीरी
सोडशील का गे नाव माझियासाठी
सोडीन नाव राजया प्रीतिच्या पाठी
देईन जिवाचें मोल अशा अवसरी, ग योजनगंधे
ने मज पैलतीरी
तुम्ही थोर, मी अशी साधीभोळी पोर
देतांच अधिक मज म्हणतिल बाई चोर
मी चकोर तूझा, तूं चंद्राची कोर
नका येउं जवळि ही कलेल बाई तरी
ने मज पैलतीरी
मत्स्यगंधे, ये सवे ही शांतवायातें तनू
भाळला गे यौवना हा मोहवेडा शंतनू
भलतीच बाइ ही तुमची चांचेगिरी
ने मज पैलतीरी
कोण कुणाची जलराणी ग सांग सखे सुंदरी
मी धीवरकुंवरी या यमुनेवरि, चालविते फेरी
ही सुकुमारी तरी कशि ग नेशिल पैलतीरी
राजया, चला या जलांत माझी नौका
भिउं नका मुळी अंतरी, बघा तरि माझी चलचातुरी
मनामनांचा सुरेख संगम, तरंगते अंतरी
ने मज पैलतीरी
सोडशील का गे नाव माझियासाठी
सोडीन नाव राजया प्रीतिच्या पाठी
देईन जिवाचें मोल अशा अवसरी, ग योजनगंधे
ने मज पैलतीरी
तुम्ही थोर, मी अशी साधीभोळी पोर
देतांच अधिक मज म्हणतिल बाई चोर
मी चकोर तूझा, तूं चंद्राची कोर
नका येउं जवळि ही कलेल बाई तरी
ने मज पैलतीरी
मत्स्यगंधे, ये सवे ही शांतवायातें तनू
भाळला गे यौवना हा मोहवेडा शंतनू
भलतीच बाइ ही तुमची चांचेगिरी
ने मज पैलतीरी
गीत | - | राजा बढे |
संगीत | - | डी. पी. कोरगावकर |
स्वर | - | कृष्णराव चोणकर, लता मंगेशकर |
चित्रपट | - | गळ्याची शपथ |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.