दूर कुठे चंदनाचे बन
दूर कुठे चंदनाचे बन जळते
तुला कळते ग मला कळते !
जाळ धावूनिया येता होरपळे अंग
शीतलशा सुगंधाने निवे अंतरंग
सुखावते कधी, कधी तळमळते
तुला कळते ग मला कळते !
दैवदत्त शाप आहे चंदनाच्या बना
जळल्यावाचून त्याचा उभा जन्म सुना
दु:खभोग भोगताना मुक्ती मिळते
तुला कळते ग मला कळते !
तुलामला चंदनाचा जन्म लाभला
अशा चंदनपणाला जीव लोभला
उगाळता जळताही दरवळते
तुला कळते ग मला कळते !
तुला कळते ग मला कळते !
जाळ धावूनिया येता होरपळे अंग
शीतलशा सुगंधाने निवे अंतरंग
सुखावते कधी, कधी तळमळते
तुला कळते ग मला कळते !
दैवदत्त शाप आहे चंदनाच्या बना
जळल्यावाचून त्याचा उभा जन्म सुना
दु:खभोग भोगताना मुक्ती मिळते
तुला कळते ग मला कळते !
तुलामला चंदनाचा जन्म लाभला
अशा चंदनपणाला जीव लोभला
उगाळता जळताही दरवळते
तुला कळते ग मला कळते !
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | अरुण दाते |
गीत प्रकार | - | भावगीत |
निवणे | - | शांत होणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.