A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नाविका चल तेथे दरवळते

नाविका चल तेथे दरवळते जेथे चांदणे

जिथे उन्हाचा स्पर्शही लोभस
सरगम गुंजत झरतो पाऊस
फुलासारखे तिथे फुलावे तुझे नि माझे जिणे

मखमालीची जिथली हिरवळ
मुळी न सुकते सुमनांचे दळ
अवकाशाच्या तारा छेडी वारा मंदपणे

प्रिय नयनांतील भाव वाचता
चुकुन दिसावा मोर नाचता
दूर देशीचे बुलबुल यावे कधीमधी पाहुणे