A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नमुनि ईशचरणा

नमुनि ईशचरणा ।
करिन मग गजाननाच्या पादस्मरणा ॥

सुकविरत्‍नमाला । अतिशोभा दे यदीय सुंदर वक्षाला ।
जिच्यामध्यें महामणी प्रकाश पाडित सुवर्णपदकीं बसोनियां कालिदास राणा ॥