किती सांगू मी सांगू कुणाला
किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदीआनंद झाला
रास खेळू चला, रंग उधळू चला
आला आला ग कान्हा आला
अष्टमीच्या राती ग यमुनेच्या काठी, गोकुळ अवतरले
गोड हसू गालात, नाचू गाऊ तालात, पैंजण थरथरले
कान्हा दिसतो उठून, गोपी आल्या नटून
नव्या नवतीचा शृंगार केला
मूर्ति अशी साजिरी ग, ओठावरी बासरी, भुलले सुरांसंगती
कुणी म्हणा गोविंद, कुणी म्हणा गोपाळ, कान्हाला नावे किती
रोज खोड्या करून, गोपबाळे जमून
सांजसकाळी गोपाळकाला
खेळ असा रंगला ग, खेळणारा दंगला, टिपरीवर टिपरी पडे
लपुनछपुन गिरिधारी, मारतो ग पिचकारी, रंगाचे पडती सडे
फेर धरती दिशा, धुंद झाली निशा
रास रंगाच्या धारांत न्हाला

गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | सतीचं वाण |
गीत प्रकार | - | चित्रगीत, हे श्यामसुंदर |
नवती | - | तरुणी / तारुण्य / नवी पालवी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.